Home महाराष्ट्र जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई  : जालना येथे मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले होते.

पण, पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलनस्थळी दगडफेक झाली. तर, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर जालन्यात बसेसची जाळपोळ करण्यात आली. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांवर, पोलिसांकडून लाठीचार्ज”

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो.

राज्यातील मराठा आंदोलनानं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना आहे., असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

विशेष अधिवेशनावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…

‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…