Home क्रीडा रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य

रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य

दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

या सामन्यात चेन्नईने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 125 धावा केल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 30 चेंडूत 35 धावा केल्या. तर एम.एस धोनीने 28 चेंडूत 28 धावा, सॅम करनने 25 चेंडूत 22 धावा केल्या. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल व राहूल टेवाटियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

शरद पवार शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सवाल

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला