Home महाराष्ट्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अमरावती : राज्यभरात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली.

नवनीत राणा यांनी दर्यापूर भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राणा यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

शरद पवार शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सवाल

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस