पहिलीच वेळ असल्याने माफ करतो म्हणणाऱ्या बच्चू कडूंना, रवी राणांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

0
280

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते रवी राणा यांच्यातील वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटवला असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र काल अमरावतीत झालेल्या सभेत बच्चू कडूंनी बोलताना, पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो, असं म्हटलं होतं. यावर आता रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणांनी यावेळी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, फडणवीसांच्या दाव्यावर, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे, अशा इशाराही रवी राणांनी यावेळी बच्चू कडूंना दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, फडणवीसांच्या दाव्यावर, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here