Home महाराष्ट्र “राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”

“राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पुण्यात प्रत्येक मतदारपर्यंत पोहचण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक नवी कल्पना अस्तित्वात आणली आहे.

पुण्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राज ठाकरेंनी राजदूत ही नवी कल्पना राबविण्याच्या सूचना मनसे पुण्याचे शहराध्यक्ष यांना दिल्या आहेत. पुण्यात 1,000 मतदारांमागे एक अशा 3,500 ‘राजदूत’ नेमण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, आगामी पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे वाढलेले दाैरे तसेच आता राजदूतची नेमलेली कल्पना यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणूकीत मनसेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

खोक्यांवरून आता रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले, ज्यांनी घेतलेत खोके, त्यांचे…

…म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट