Home महाराष्ट्र “…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार?”

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी आज पार पडली. सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. चार आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अशातच आता घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एक मोठं विधान केलं आहे.

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं, असं मोठं विधान घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे.

हे ही वाचा : शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तर या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्रीच अपात्र झाले तर सरकार पडेल, असं उल्हास बापट म्हणाले. तसेच कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला बोलावलं तर सरकार पुन्हा येऊ शकतं, असा दावा उल्हास बापट यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

खोक्यांवरून आता रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले, ज्यांनी घेतलेत खोके, त्यांचे…

…म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

“मोठी बातमी! शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड; ब्रीच कँडी रूग्णालयात होणार दाखल”