Home महाराष्ट्र राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

मुंबई :  मनसेनं पक्षाचा जुना ध्वज बदलून छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या बदलेल्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं सडकून टीका केली. शिवसेनेनं केलेल्या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला प्रत्यृत्तर दिलं आहे.

आधुनिक अफजल खानने मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एक नाही तर दोन दोन झेंड्यांची योजना करणं ही गोंधळलेल्या मनस्थितीत किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे, असं शिवसेनेनं सामनामध्ये म्हटलं होतं, त्यावर संदीप देशपांडे शिवसेनेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही”

“शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”

…म्हणून भाजपने हा तपास एनआयए कडे सोपवला- सचिन सावंत

“दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”