Home महाराष्ट्र “दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”

“दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”

मुंबई : एखाद्या राजकीय पक्षाने दोन झेंड्यांची योजना करणे ही गोंधळलेल्या मन:स्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे, असं म्हणत शिवसेनेने सामना मुखपत्रातून मनसेवर निशाणा साधला आहे.

मनसे प्रमुखांना त्यांचे मुद्दे माडंण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका आणि त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडेलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मुळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे. आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा. असं म्हणत शिवसेनेने मनसेवर टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर ती चुकीची गोष्ट आहे; रोहित पवारांचा भाजपला इशारा

भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार

मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे

“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”