Home महाराष्ट्र मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे

मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन झालं. यामध्ये मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे, असं म्हणत उद्धव ठाकेर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिवसेनेच्या अयोजित केलेल्या वचनपुर्ती मेळाव्यात बोलत होते.

शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. तसा शब्द मला भाजपकडूनही देण्यात आला होता. मात्र त्यांनी शब्द फिरवला. बाळासाहेबांची खोली शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. या खोलीत दिलेलं आश्वासन भाजपनं मोडलं. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. तसं झालं असतं तर मी शिवसैनिकांसमोर कसा जाऊ शकलो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मी केवळ उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे कधीही जबाबदारीपासून पळ काढलेला नाही आणि यापुढे काढणारही नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”

मनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावं- रामदास आठवले

“शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”

मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध