Home महाराष्ट्र “माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार...

“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”

मुंबई : मनसेनं पक्षाचा जुना ध्वज बदलून छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं, यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

बदल हा नेहमी करायचा असतो. माझ्या मनात जसा झेंडा होता. तसा मी हा 14 वर्षानंतर आणला आहे. हाच खरा झेंडा आहे. त्यामुळे मी हिंदूही आहे आणि मराठीही. त्यामुळे जर यापुढे ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी  यावेळी दिला.

मी पहिल्या सभेतच सांगितलं आहे, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत.  त्याचवेळी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून येणारे मुस्लिम आमचे नाहीत. त्यांना त्यांच्या देशात हाकलून द्या, असंही राज म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावं- रामदास आठवले

“शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”

मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध

‘हा’ मराठी अभिनेता म्हणतो… राज ठाकेर हे ‘जाणता राजा’