Home महाराष्ट्र “शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”

“शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”

मुंबई : मनसेनं पक्षाचा जुना ध्वज बदलून छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं. त्यावर शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही. शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे

शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे. हिंदुत्व हा टक्कर देण्याचा विषय असू शकत नाही. सत्ता येते जाते. पाय जमिनीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे, असं राऊत म्हणाले.

वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होतं, तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूंदे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही, असं म्हणत  राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला.

दरम्यान, जगज्जेते कोणत्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध

‘हा’ मराठी अभिनेता म्हणतो… राज ठाकेर हे ‘जाणता राजा’

मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट; आता राज ठाकरेही म्हणतात ‘हे भगवा रंग’

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले- उद्धव ठाकरे