Home महत्वाच्या बातम्या मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध

मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेने आपल्या पक्षाचा जुना ध्वज बदलून छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील आक्षेप घेतला आहे.

पक्षाच्या ध्वजावर राजमुद्रेचा वापर करणं म्हणजे गैरकृत्य आहे. एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका कोणत्या पक्षाला पटली नाही तर त्या राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन होतात. त्यावेळी पक्षाचे ध्वज जाळले जातात. त्यामुळे महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान झालेला आम्हाला चालणार नाही, असं विनोद पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या काळात उत्साही कार्यकर्ते सगळीकडे ध्वज लावतात. नंतर ते झेंडे निवडणूक अधिकाऱ्यांकडून उतरुन डंम्पिंग ग्राऊंडला जातात. त्यामुळे आमचा मनसेच्या ध्वजाला विरोध आहे, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी  मुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. राजमुद्रा असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याला मान्यता देऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘हा’ मराठी अभिनेता म्हणतो… राज ठाकेर हे ‘जाणता राजा’

मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट; आता राज ठाकरेही म्हणतात ‘हे भगवा रंग’

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले- उद्धव ठाकरे

सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत- पंकजा मुंडे