Home नाशिक राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील

राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. आशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला. ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, असंही गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; भाजपच्या ‘या’ आमदाराचा असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”

“सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”

केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका

राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या; अजित पवार म्हणाले, जरुर, पण…