Home महाराष्ट्र केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका

केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थितीत राज्य सरकार मदतीचं काम तर करेलच पण केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन राज्याला निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा व विदर्भ… आणि आज पुन्हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र… अतिवृष्टीने शेतकऱ्याला पूर्णत: घायाळ केलंय. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं अतोनात झालेलं नुकसान हे न भरून निघणारं आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या संकटाने हिरावलाय, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला देईल, असा विश्वास आहे. केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, “बदलतं हवामान आणि वाढत्या आपत्ती बघता शेतीत शाश्वत उत्पन्न राहिलेलं नाही. शेतीसमोरील आव्हाने अतिशय किचकट होणार आहेत. त्यामुळं भविष्यात शाश्वत आणि परवडणाऱ्या शेतीसाठी नवीन धोरण आणि योग्य उपाययोजनाही वेळीच आखाव्या लागतील, हेही तेवढंच खरंय”, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या; अजित पवार म्हणाले, जरुर, पण…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची मागणी

भर कार्यक्रमात भाजपचा नेता स्टेजवरून कोसळला; पहा व्हिडिओ

“केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”