Home महाराष्ट्र “सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”

“सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिका सोडून इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं, असं म्हणत अजित पवारांनी नाराज असणाऱ्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय झाल्यावर सर्वांनी फक्त समाधानी राहायचं असतं. उगीचच त्यात पुन्हा एकदा वेगळं मत मांडून कारण नसताना गैरसमज पसरवायचे नसतात, असं माझं मत आहे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका

राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या; अजित पवार म्हणाले, जरुर, पण…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची मागणी

भर कार्यक्रमात भाजपचा नेता स्टेजवरून कोसळला; पहा व्हिडिओ