Home नांदेड “प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची...

“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”

322

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात जोरदार राजकारण सुरू आहे. अशातच आता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

आम्हांला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवाधर्म आहे. आमचं हिंदुत्व रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाए, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटकपक्षांनी दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणार, असा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. ते नांदेडमधील उपजिल्हा रूग्णालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

हे ही वाचा : शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही; भाजपचा हल्लाबोल

दरम्यान, आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोविडचं एवढं मोठं संकट आलं. पण आम्ही थांबलो नाही. रायगडला आम्ही 600 कोटी दिले, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पण त्याची प्रसिद्धी झाली नाही. धर्म, हिंदुत्व हे आम्हांला शिकण्याची गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आपण खंबीरपणे आमच्या मागे उभे रहा. आपल्याला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपा खासदाराची राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणत टीका; आता मनसेकडून प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट; तब्बल ‘इतक्या’ डाॅक्टर्संनी हाती घेतला भाजपचा झेंडा”

कोरोनाची चाैथी लाट जून-जुलैमध्ये?; राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…