Home क्रीडा पॅट कमिन्सची वादळी खेळी; कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय

पॅट कमिन्सची वादळी खेळी; कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय

406

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आजच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा 5 विकेट्स राखत पराभव केला.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 161 धावा केल्या. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 36 चेंडूत 5 चाैकार व 2 षटकारांसह 52 धावा केल्या. डेविल्ड ब्रेेविसने 19 चेंडूत 29 धावा केल्या. तर शेवटी तिलक वर्माने 27 चेंडूत 3 चाैकार व 3 षटकारांसह 38 धावा तर पोलार्डने केवळ 5 चेंडूत नाबाद 22 धावा करत मुंबईला 160 चा पल्ला पार करून दिला. तर कोलकाताकडून पॅट कमिंसने 2, तर वरूण चक्रवर्ती व उमेश यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : “पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच दिसतील; ‘या’ नेत्याचा दावा”

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना कोलकाताने हे लक्ष्य केवळ 16 षटकातच पूर्ण केलं. कोलकाताकडून पॅट कमिंसने या सीजनमधील वेगवान अर्धशतक झळकावलं. कमिंसने केवळ 14 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कमिंसने 15 चेंडूत नाबाद 56 धावांची विस्फोटक खेळी केली. कमिंसने आपल्या खेळीत 4 चाैकार व 6 षटकारांची आतीषबाजी केली. तर सलामीवीर वेंकटेश अय्यरने नाबाद 41 चेंडूत 50 धावांची खेळी करत कोलकाताला विजय मिळवून दिला. तर मुंबईकडून टाईमल मिल्स व मुरूगन अश्विनने प्रत्येकी 2 विेकेट्स घेतल्या. तर डॅनियल सॅम्सने 1 विेकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”

‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’; वंचित बहुजन आघाडीचं राज ठाकरेंना थेट आव्हान

‘…म्हणून पूनम पांडेने ओलांडल्या सर्व मर्यादा’; कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस