Home महाराष्ट्र “शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”

“शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून जोरदार राजकारण सुरू आहे. अशातच काल ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. अशातच आज पवारांनी मोदींची भेट घेतल्यानं अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : ‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’; वंचित बहुजन आघाडीचं राज ठाकरेंना थेट आव्हान

दरम्यान, या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या भेटीबद्दल माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राऊत हे पत्रकार आणि राज्यसभेतील सदस्य आहे. त्यांच्यावरील कारवाई हा अन्याय आहे, असं मोदींना सांगितल्याचं पवार म्हणाले. तसेच अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांनी 12 विधान परिषद सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. राज्यातील नेत्यांनी भेटून राज्यपालांना या नियुक्तीबाबत विनंतीही केली. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘…म्हणून पूनम पांडेने ओलांडल्या सर्व मर्यादा’; कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस

“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला

रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज; रोहित पाटलांनी केला गडकरींच्या भेटीचा किस्सा शेअर