Home महाराष्ट्र “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला

“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित 11 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर मंगळवारी जप्ती आणली. यावरुन आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

मशिदींच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली.’ असं ट्वीट करत अमेय खोपकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज; रोहित पाटलांनी केला गडकरींच्या भेटीचा किस्सा शेअर

दरम्यान,  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरुन राजकारण तापलेलं असतानाच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडत संजय राऊतांवर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनंं पुन्हा डिवचलं; शिवसेना भवनसमोर केली बॅनरबाजी

चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ‘ह्या’ पाच गोष्टी खाणे टाळा

“मशिदीवरील भोंग्याच्या आदेशावरून मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे नाराज”