Home मनोरंजन डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं अनेकांना पडलं महागात; सहभागी झालेल्या तब्बल...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं अनेकांना पडलं महागात; सहभागी झालेल्या तब्बल 30 हजार जणांना कोरोनाचा धोका

न्यूयाॅर्क : कोरोनाच्या संकटाच्या काळात अमेरिकेत निवडणुकांचे वारे वाहू लागलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळू लागले असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना महागात पडण्याची शक्यता आहे.

याबाबत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जून ते 22 सप्टेंबर या दरम्यान 18 रैली काढल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच 700 जणांचा मृत्यू होऊ शकतो, असंही स्टॅनफोर्ड विद्यापीठानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माणुसकीचा फ्रीज, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा नवा उपक्रम”

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा- अतुल भातखळकर

पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती