“माणुसकीचा फ्रीज, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा नवा उपक्रम”

0
260

मुंबई : मुंबई शहरात कधीच कोणाला उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून मनसेनं एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाला सुरुवात केली आहे. माणुसकीचा फ्रीज असं या अनोख्या उपक्रमाचं नाव आहे.

कोणीही उपाशीपोटी झोपू नये, या प्रामाणिक भावनेने आम्ही एक उपक्रम सुरू करत आहोत. आमच्या माहीम व दादरच्या कार्यालयात एक फ्रीज ठेवत आहोत. नागरिकांनी घरात शिजवलेलं अन्न, फळं, बिस्किटं यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते स्वेच्छेने या फ्रीजमध्ये आणून ठेवाव्यात. व जो भुकेला आहे त्यांने त्या घेऊन हे अन्न घेऊन जाव्यात, अशी ही संकल्पना आहे., असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

आमच्या सर्व सामाजिक उपक्रमांना नेहमीच आपले सहकार्य लाभले आहे तसेच यापुढेही लाभेल अशी आशा आहे., असं ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा- अतुल भातखळकर

पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…पण हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे; मंदिरं खुली करण्यावरून प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here