Home पुणे करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या….

करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : जातिवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, चुकीचा अध्यक्ष नेमला जाऊ नये! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे राज्याची मान खाली गेली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने करुणा शर्मा यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका केली. करुणा शर्मा प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“देवेंद्र फडणवीस आणि मी चांगले मित्र आहोत; मित्र मित्राला मिठी नाही मारणार तर कोणाला मारणार?”

राज्य मंत्रिमंडळाच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा; राष्ट्रवादी काँग्रेस खाणार भाजपची मते