Home महाराष्ट्र “आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”

“आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. साकीनाका आणि डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय. तसंच महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘कल्याणमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“देवेंद्र फडणवीस आणि मी चांगले मित्र आहोत; मित्र मित्राला मिठी नाही मारणार तर कोणाला मारणार?”

राज्य मंत्रिमंडळाच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा; राष्ट्रवादी काँग्रेस खाणार भाजपची मते

“शरद पवारांवर खरंच प्रेम असेल, तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचे झेंडे फडकवा”