Home महाराष्ट्र आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची...

आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यावरुन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही9 मराठी सोबत बोलत होते.

हे ही वाचा : औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरुन जे आहे ते पोलीस करत आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असते मला त्यावर काही बालायचे नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील. आत्ता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहिती पडलं देशातला कायदा नेमका काय आहे तो. यापूर्वी नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये मारा, ठोका आणि पळून जा अशा पद्धतीने सुरु होते. यामुळे कायद्याचे हात किती लांब पर्यंत जावू शकतो हे आता सिद्ध झाले आहे, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची टीका

‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची