Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष तहीर पटेल, सेवादलाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुदेशना रायते, जिल्हा उपाध्यक्ष शशिकला सिंह, जिल्हाध्यक्ष मजदूर सेल अमित लोखंडे, नरेश कुमारी मेहमी, जिल्हा अध्यक्ष ट्रान्सपोर्ट सेल विनीत कांडपीले आणि महिला कळंबोली ब्लॉक अध्यक्ष जयश्री खटकलेयांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हे ही वाचा : ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही- नितेश राणे

सुदाम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पक्ष वाढविण्यासाठी ताकद मिळेल. लोकांनी ज्यांच्या हातात पनवेल शहर दिलं, ते लोक पूर्णपणे अपयशी ठरले. म्हणूनच पनवेलकर नवा आधार शोधत आहेत. आपण त्यांना नवा पर्याय देऊ. आपला पक्ष जरी छोटा असला तरी आपल्या पक्षात प्रत्येकाला मान आहे. त्यामुळे भाजपचे खासदार आमदारही आज राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत. मला खात्री आहे येत्या काळात तुम्हा सर्वांच्या मदतीने या भागात पक्ष वाढेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीवर मनसेच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया; चर्चेंना उधाण

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश, ठाकरे सरकारकडून मोठी पगारवाढ, मात्र एसटी कर्मचारी उद्या भूमिका जाहीर करणार”