Home महाराष्ट्र “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश, ठाकरे सरकारकडून मोठी पगारवाढ, मात्र एसटी कर्मचारी...

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश, ठाकरे सरकारकडून मोठी पगारवाढ, मात्र एसटी कर्मचारी उद्या भूमिका जाहीर करणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ विश्वासू नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

या बैठकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते. मात्र पत्रकार परिषदेनंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलक कामागारांमध्ये जाऊन, बैठकीबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर आपण आपली अंतिम भूमिका ही आज रात्रभर विचारमंथन व चर्चा करून, उद्या सकाळी 11 वाजता माध्यमांसमोर जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

परब यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेला आम्ही हजर होतो. सरकारने मांडलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला आणि त्यानंतर आम्ही भूमिका घेतली, की आम्ही आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू आणि मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू. त्यामुळे कोणत्याही कामगाराने आपलं वेगळं मत मांडू नये. आम्ही तुमच्या बरोबर आहोत,जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सगळे मिळून विचार करून घेऊयात. आपला निर्णय झाल्यानंतर उद्या सकाळी माध्यमांशी बोललं जाईल., असं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता”

नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा आरोप

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेचा पराभव का झाला?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…