Home देश “मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”

“मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिलाँग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता तृणमूल पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

मेघालयमध्ये मोठी राजकीय भूकंप पहायला मिळाला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांच्यासह 11 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीवर मनसेच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया; चर्चेंना उधाण

गेल्या काही महिन्यांपासनू मेघालय काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख विंसेट यांची मेघालयच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून खळखळ सुरू होती. विंसेट यांची नियुक्ती करण्याआधी नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही, अशी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते मुकूल संगमा यांची नाराजी होती.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मुकूल संगमा आणि विंसेट यांची भेट घेऊन दोघांचीही समजूत घातली होती. यानंतर संगमा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश, ठाकरे सरकारकडून मोठी पगारवाढ, मात्र एसटी कर्मचारी उद्या भूमिका जाहीर करणार”

 “शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ विश्वासू नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता”