आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केलीय.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात येते. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
ही बातमी पण वाचा : जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून, काँग्रेसचे नाना पटोले यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यातचं सत्तेपासून दूर ठेवलं.
या निवणुकीत 18 पैकी काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळावता आला. तर, भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 14 जागांवर विजय मिळविला.
महत्त्वाच्या घडामोडी –
भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात
भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ
भाजपला धक्का; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा