Home महाराष्ट्र राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू येथे आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू आहे. पण, याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच बारसू येथे जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं. आम्ही आहोत, बघूया काय होतं, ते, असं आवाहन नारायण राणेंनी यावेळी केलं. ते माध्यमांशी बोलत होते. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी; काँग्रेसचा दारुण पराभव

कोकण काय नारायण राणेंच्या बापाचं आहे का? येथे पाय ठेऊन देणार नाही, तिथे पाय ठेऊ देणार नाही. तुमचे पाय कुठेयात ते पाहा. काय आणि कोणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. पाय ठेऊन देणार नाही म्हणजे, कोणाची दलाली करत आहात. कोकणात एकदा नाही दोनदा आपण पराभूत झाला आहात. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेने राहा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, असे खडेबोल संजय राऊतांनी, राणेंना सुनावलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात

भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ