Home बीड भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात

भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी बाजार समितीचे निकाल आले आहेत.

या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. तर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अंबाजोगाई आणि परळीत पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपला धक्का; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

दरम्यान, इतर बीड जिल्ह्यातील इतर बाजार समित्यातही राष्ट्रवादीनेच मुसंडी मारली आहे. बीड जिल्ह्यात प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार आहेत. तर पंकजा मुंडे यांचं मोठं वर्चस्व आहे. तरीही राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ

“धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; तिवसा बाजार समितीत काँग्रेसची मुसंडी