Home महाराष्ट्र नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या  पत्नी अमृता फडणवीस  नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. अमृता फडणवीसांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेल्या टिपण्ण्यांची चांगलीच चर्चा होतं असते. आजचं त्यांचं ट्वीटही तसंच आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात त्यांनी कुणाचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांचं ट्विट पाहिल्यावर त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे सहज कळून येत आहे.

हे ही वाचा : शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

अमृता फडणवीस यांनी काही प्रश्न ट्वीट केले आहेत. “थोडक्यात उत्तर द्यावे …50 मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …50 मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

राष्ट्रवादीकडून भाजपला मोठं खिंडार, इंदापूरमधील सरपंचासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ

भाजपने अमृता फडणवीसांना प्रवक्ता म्हणून जाहीर करावं; मनिषा कायंदेंचा टोला