Home महाराष्ट्र निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचे बॅनर  रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून राज्यभर चर्चेला उधाण आलं आहे. यांनतर संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला.

बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे हा बॅनरचा वाद वाढताना दिसून येत आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र  तिसरं आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाही. त्यामुळे या तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असं लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीकडून भाजपला मोठं खिंडार, इंदापूरमधील सरपंचासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ

तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे.

‘मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असं बॅनरमध्ये लिहलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपने अमृता फडणवीसांना प्रवक्ता म्हणून जाहीर करावं; मनिषा कायंदेंचा टोला

गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या, फ्लाॅवर नही, फायर है- चित्रा वाघ