Home महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गैाप्यस्फोट केला आहे.

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे संबंध कोणामुळे बिघडले? यावर एकदा प्रकाश पडायला हवा. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे असते तर संबंध इतके विकोपाला गेले नसते हे खरंच आहे. पक्षात उपेक्षा व घुसमट होत आहे या असंतोषाचा स्फोट होऊन श्री. मुंडे हे तेंव्हा पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत होते. दिल्लीत येऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या. शिवसेनेत यायचीही त्यांची तयारी होती, पण ‘गोपीनाथ, तू भाजप सोडू नकोस. दिवस बदलतील, लढत रहा,’ असा सल्ला तेंव्हा बाळासाहेबांनी दिला व मुंडे यांनी तो ऐकला, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या, फ्लाॅवर नही, फायर है- चित्रा वाघ

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजपवर टीका केली होती. शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले. याच मुद्यांवरुन संजय राऊतांनी भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आज वाईन विकायला लागेलत, पुढे दारु विकायला लागतील; रावसाहेब दानवेनाचा राज्य सरकारला टोला

महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करणार की नाही, याचा निर्णय केवळ राज ठाकरे घेतील”