Home महाराष्ट्र नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य

नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य

मुंबई : नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत, असं वक्तव्य भाजपचे जेष्ठ्य नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवेंनी टीव्ही9 मराठीला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.

नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी पवारांना नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यातही नाथाभाऊ होते, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी भाजपमध्ये नाथाभाऊंना सीनियर आहे. त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहीत आहे, असही रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?; अमृता फडणवीसांची प्रियांका चतुर्वेदींवर टीका

अखेर ठरलं! राज्यात 25 ऑक्टोबरपासून जिम सुरू होणार; राज्य सरकारचा निर्णय जारी

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग; 10 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले