नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे- गुलाबराव पाटील

0
298

जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे.

भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे, अशी टीका गुलाबराव पाटलांनी नारायण राणेंवर केली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे. मात्र, हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“राणे-शिवसेना वाद वाढला! पुण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात सोडल्या कोंबड्या”

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले होते, मग त्यांचं काय करायचं?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी मारते- नारायण राणे

“खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून देऊ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here