“राणे-शिवसेना वाद वाढला! पुण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात सोडल्या कोंबड्या”

0
380

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे नोंदवले आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली.

दरम्यान, मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेनं नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला होता. त्यावर “कोंबडी चोर !!!” असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले होते, मग त्यांचं काय करायचं?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी मारते- नारायण राणे

“खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून देऊ”

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here