Home महाराष्ट्र नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…

नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवासेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदार पुत्राचा भाजपात प्रवेश

होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत हे बाळासाहेब  आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे बोलले आहेत. बाळासाहेबांनी इशारा केला असता तर संजय राऊत राहिलेही नसते. असंही नारायण राणे म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे झुकले म्हणून मुख्यमंत्री झाले, सत्तेसाठी लाचार झालेल्यांनी…; रावसाहेब दानवेंची टीका

 संजय राऊतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा; नारायण राणेंचा आरोप

शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश