माझे आणि राष्ट्रवादीचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार; शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला विश्वास

0
1360

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत, मी आणि राष्ट्रवादी मिळून जे पॅनेल होत आहे, ते 100 टक्के विजयी होणार आहे, असा विश्वास खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

काहीजण मागच्या निवडणुकीत जागा अडविण्याठी बॅंकेत आले आहेत, अशांना आता घरी बसवावे, असा हल्लाबोलही शिवेंद्रराजेंनी यावेळी केला. सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणकीसाठी आज सकाळी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : “पाकिस्तानविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर सांगलीत क्रिकेटप्रेमींनी टी.व्ही. फोडला; पहा फोटो”

गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चाललं आहे. बॅंक राज्यात, देशात कायम एक नंबरला राहिलेली आहे. सध्या सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितलं आहे. जागा वाटप झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्यात येणार आहे, त्यामुळे बंडखोरी होणार नाही, असा दावाही शिवेंद्रराजेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

रोज ‘लवंग’ चे सेवन करा होतील हे फायदे!

पाकिस्तानचा दणदणीत विजय; विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर केली मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here