मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर करणार नव्या घरात ‘गृहप्रवेश’ !

0
1146

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार आहेत दादर येथील ‘कृष्णकुंज’शेजारीच नवी इमारत बांधण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून राज ठाकरे कुटुंबियांसह शिवाजी पार्क येथील ‘कृष्णकुंज’ येथे राहतात. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असो किंवा इतर कार्यक्रम याच निवासस्थानी आयोजित करतात. मात्र, हे सर्व समीकरण लवकरच बदलणार असून नव्या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे.

हे ही वाचा : “भाजपा-शिवसेना युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली”

दरम्यान, नव्या इमारतीत नवे कार्यालयदेखील असल्याची माहिती आहे. यापुढची भेटीगाठी नव्या घरातून केली जाणार आहेत. त्याशिवाय इतर मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच ठाकरे कुटुंब पाडव्याच्या मुहूर्तावर दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”

पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

भारताची विजयी आतषबाजी; अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here