Home महाराष्ट्र पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईजवळ असलेल्या पालघरमध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या संधीबाबत विचारमंथन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या पर्यटन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : भारताची विजयी आतषबाजी; अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

यासंदर्भात प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणातील सागरी किनारा नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित असून, मुंबईत बॉलिवूड आणि क्रिकेट संग्रहालय उभारण्यासाठी पावले टाकण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मुंबई विमानतळाचा वापर पूर्ण क्षमतेने होत असून नवी मुंबई विमानतळावरील सेवाही कमी पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईजवळ पालघरमध्ये हे तिसरे विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे

समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

“औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; काँग्रेसच्या सभापतींचा पक्षाला रामराम”