Home महाराष्ट्र भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…

भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अभिनेता सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यावर प्रतिक्रिया देत, महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच दिला आहे. यावरून आता मनसेनं प्रतिक्रिया दिग्दर्शक ओम राऊत यांच्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सूपारी दिली होती; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा, ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी आहे, असं अमेय खोपकर म्हणाले.

ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे., असंही अमेय खोपकरांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

संजूची सॅमसनची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय

‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…