Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आपली सभा घेतली तर एकनाथ शिंदे यांनी बिकेसी मैदानावर मेळावा घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात मंचावर बाळासाहेब ठाकरेंचे सर्वात मोठे पुत्र, जयदेव ठाकरे, नातू निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे हे मंचावर दिसून आले. यावरून भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरे यांनी मोजून 150 च्या वर शिव्या किंवा तत्सम शब्दाचा वापर केला. तुमच्या कुटुंबातील लोक जर मंचावर बसत असतील तर दुसऱ्यानं बोलण्याऐवजी स्वतः चिंतन करण्याची गरज आहे, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

हे ही वाचा : भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…

सामना हे आता वर्तमान पत्र राहिलेले नाही. ते आता शिवसेनेचे जाहिरात पत्र झाले आहे. सत्ता गेल्याची जी खदखद शिवसेनेच्या मनात आहे ती सामनातून व्यक्त केली जात आहे. 2019मध्ये जनमताचा अवमान करत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्ध निर्णय घेतला. त्यामुळे एका शिवसैनिकाने खुद्दारी केली, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, विचारांचे सोन देतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजया दशमीचा उत्सव हा शिमग्याचा उत्सव करण्याचे काम केले. हे सर्वांनी बघितले. हे कुठले वैचारिक सोने आहे, असा सवालही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सूपारी दिली होती; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप

मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

संजूची सॅमसनची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय