Home क्रीडा मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

280

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गेल्या काही दिवसांपासून एका खेळाडूवरती बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पण त्या क्रिकेटरने फेसबुक पोस्ट करत याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र तरूणीची वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्या खेळाडूविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानुसार त्या खेळाडूला काल पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या खेळाडूने IPL मध्ये चांगली कामगिरी केली होती.

नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछेन या खेळाडूला काल पोलिसांनी काठमांडू विमानतळावर अटक केली. संदीपवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ज्यावेळी नेपाळच्या पोलिसांनी त्या मुलीची वैद्यकीय चाचणी केली, त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याच निष्पन्न झालं होतं. त्यामुळे नेपाळ क्रिकेट बोर्डाने तात्काळ कारवाई करण्यासाठी संदीपला निलंबित केलं.

हे ही वाचा : ‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, संदीप लामिछाने याला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या, स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजता काठमांडू येथून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत संदीपने फेसबुक पोस्ट करत याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. यामध्ये त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचे सांगितले. आपण निर्दोष असून कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी पोलिसांना सहकार्य करेन, आणि माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन, असं संदीपने या पोस्टमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय; मनसेचा हल्लाबोल