मुंबई : लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
लोअर परिसरातील वन अविघ्न पार्क या इमारतीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Fire broke out at the multi-storey Avighna park apartment on Curry Road, around 12 noon today. No injuries reported. pic.twitter.com/W9KqsQLkPr
— ANI (@ANI) October 22, 2021
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा व्यक्ती इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की, तो व्यक्ती आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या व्यक्तीने इमारतीवरुन उडी घेतली. त्यात ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं
संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका
‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर