Home पुणे मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं

मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे मागच्या वर्षापासून राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे  अनेक दिवस बंद होती. मात्र आता कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याने राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृह आजपासून खुली करण्यात येत आहेत., असा निर्णय राज्य सरकारने घेतला.

पुण्यात आज बालगंधर्व नाट्यगृहांचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. सर्वोतपरी सहकार्य हे सरकार करेल आणि सुविधा उपलब्ध करून देईल. काही लोकांचे प्रयत्न आहेत की बॉलीवूड महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जायचं. त्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री इथे आले देखील होते. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल, असं म्हणत अजित पवारांनी आदित्यनाथांना चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीये; औरंगाबाद महिला बलात्कार घटनेवरून चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कामा नये- निलेश राणे