Home मनोरंजन ‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन

‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. रविवारी सकाळी अमृताने एका गोड बाळाला जन्म दिला. यावेळी तिचा नवरा आरजे अनमोल हा पूर्ण वेळ तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत.

काही दिवसांपूर्वी अमृताने स्वतः इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती.


यानंतर अमृताने नवरात्रीदरम्यान एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामध्ये ती बेबी बंप दाखवताना दिसत होती. त्यांनी लिहिलं की, नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर नवव्या महिन्यात मी खूप भाग्यवान आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना टोला

ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी

पॅट कमिंसची घातक गोलंदाजी; कोलकाताची राजस्थानवर 60 धावांनी मात

“नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत”