Home नागपूर “महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी वडिलांचं झालं...

“महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी वडिलांचं झालं होतं निधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं आज निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.

खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती 28 मे रोजी अचानक बिघडली होती. धानोरकर यांना एयर ॲम्ब्युलन्सने नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. मागील 3 दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सौम्य सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज पहाटेच तीव्र धक्क्याने निधन झालं.

ही बातमी पण वाचा : कुणाच्या शपथविधीवर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; राज ठाकरेंनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, याआधीही, त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २ दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं विधान

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?, नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…