Home अहमदनगर उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं...

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं विधान

299

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र वंचितवरुन प्रकाश आंबेडकरांनी, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी ठोस भूमिका घेतली नसतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे.

शिर्डी येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना, प्रकाश आंबेडकर यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.

ही बातमी पण वाचा : “संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”

प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं. मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहू या.. उद्धव ठाकरेंकडे तुम्हांला काही मिळणार नाही, असं रामदास आठवलेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. तसेच त्याचबरोबर ‘महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमूठ.. आणि रोज करतेय सगळ्यांची लूट’ असं म्हणत रामदास आठवेलंनी आपल्या खास कविता शैलीत महाविकास आघाडीला टोला लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”

“सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”

संसदेच्या नव्या उद्घाटन सोहळ्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…