Home महाराष्ट्र कुणाच्या शपथविधीवर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; राज...

कुणाच्या शपथविधीवर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; राज ठाकरेंनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : झी मराठी या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील काही व्हिडिओ समोर आले आहेत. या शोमध्ये राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून दिसत आहेत.

गुप्ते यांनी राज यांना राजकीय प्रश्न विचारला. हा प्रश्न राज्यात मागच्या चार वर्षांत बदललेल्या दोन मुख्यमंत्र्यांबद्दल होता.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल

गेल्या 4 वर्षांत शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. दोन्हीही मुख्यमंत्री, ‘आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं’, असं म्हणताना दिसले. पण, तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या?” असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरेंना विचारला. यावर राज यांनी उत्तर दिलं.

कुणाच्याच नाही. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं आणि महाराष्ट्र तसाच पूर्वीसारखा बलशाली होणं, हे माझ्यामते बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं, त्यांचं स्वप्न नव्हतं, असं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्टच सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं विधान

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?, नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…

“संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”