Home महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?, नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?, नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…

211

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या सर्व चर्चा आणि अफवांवर नाना पटोलेंनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”

तुमच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारी गेल्या आहेत. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर काय सांगाल. , असा सवाल नाना पटोले यांना केला असता, त्यावर नाना पटोले यांनी, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे., असं उत्तर दिलं.

दरम्यान, मी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला आहे. या सर्व गोष्टींना काँग्रेस पक्षात स्थान नाही. आम्ही सर्वजण सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कशा जिंकता येतील याच्या योजनांवर काम करत आहोत. तसेच मी प्रसारमाध्यमांचे आभार मानेन, कारण गेल्या काही दिवसात या चर्चांमुळे तुम्ही माझ्या नावाला खूप प्रसिद्धी दिली आहे. परंतु या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या सगळ्या बातम्या केवळ सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. कुठलाही नेता माध्यमांसमोर काहीही बोललेला नाही., असं नाना पटोलेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”

संसदेच्या नव्या उद्घाटन सोहळ्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाविकास आघाडीकडून कोरोनाकाळात 25 कोटींचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप